आमच्याविषयी
श्री. बुवानंद को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. डफळापूर
सर्वसामान्यांच्या गरजा, स्वप्नं आणि ध्येयं पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत, आणि हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे. सर्वांना संपूर्ण सुरक्षा देणे, त्यांचं भविष्य उज्ज्वल करणे, आर्थिक साक्षर करणे, महिला सक्षमीकरण करणे, उद्योजक घडवणे.. अशा अनेकानेक संकल्पांद्वारे देशसेवेत आम्ही योगदान देणे. हा आमचा प्रामाणिक दृष्टीकोन आहे. आपल्या आशिर्वादामुळेच श्री. बुवानंद अर्बन सभासदांचा परिवार दिवसेंदिवस विशाल होत आहे. आज संस्थेचे 2 हजाराहून अधिक समाधानी ग्राहक आहेत. या सहकार्याबद्दल आपले मनापासून सदैव ऋुणी आहोत. आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबध्द आहोत, असेच सोबत राहा. आपली आर्थिक उन्नती, पत वाढविण्यासाठी आमचे सर्व कर्मचारी, एंजन्ट कायम सेवक म्हणून तुमच्या सेवेत दाखल आहेत.
समाधानी व सुरक्षित सेवा
लवकरचं एटीएम सेवा
आपल्या सेवेसाठी लवकरचं संस्थेची एटीएम सेवा ३६५ दिवस २४ तास निरंतर सुरू होणार आहे.
ठेव योजना
आपल्या ठेवीचा प्रत्येक रूपया सुरक्षित. योग्य कर्ज वितरण व गुंतवणुकीचे योग्य नियोजन आम्ही करत असल्याने आपल्या कष्टाचे पैसे पाहिजे तेव्हा उपलब्ध आहेत.
सुरक्षेसाठी विमा योजना
आपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य व अपघात झाल्यावरही अर्थसहाय्य. संस्थेचे २२००० हजाराचे शेअर्स घेणाऱ्या सभासदास विमा योजनेचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
कर्ज योजना
छोटे मोठे उद्योजक,व्यवसायिक यांना आर्थिक हातभार लावणाऱ्या कर्ज योजना,कमी कागदपत्रामध्ये अर्थ सहाय्य उपलब्ध.कर्ज योजनेच्या अनेक योजना उपलब्ध
बँकिंग क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय
२ हजार +
समाधानी सभासद
१० + कोटी
व्यवसाय
१२%+
सर्वोत्तम ठेव योजना
आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जात मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत अधिक कामे. ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी बुवानंद अर्बन बँक मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.