आमच्याविषयी
आमच्याविषयी
श्री. बुवानंद को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. डफळापूर
सर्वसामान्यांच्या गरजा, स्वप्नं आणि ध्येयं पूर्ण करण्यासाठी आम्ही अखंड कार्यरत आहोत,आणि हे केवळ आमचं काम नाही तर कर्तव्य आहे. सर्वांना संपूर्ण सुरक्षा देणे, त्यांचं भविष्य उज्ज्वल करणे,आर्थिक साक्षर करणे,महिला सक्षमीकरण करणे, उद्योजक घडवणे.. अशा अनेकानेक संकल्पांद्वारे देशसेवेत आम्ही योगदान देणे.हा आमचा प्रामाणिक दृष्टीकोन आहे.आपल्या आशिर्वादामुळेच श्री.बुवानंद अर्बन सभासदांचा परिवार दिवसेंदिवस विशाल होत आहे.आज संस्थेचे 2 हजाराहून अधिक समाधानी ग्राहक आहेत.या सहकार्याबद्दल आपले मनापासून सदैव ऋुणी आहोत.आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबध्द आहोत,असेच सोबत राहा.आपली आर्थिक उन्नती,पत वाढविण्यासाठी आमचे सर्व कर्मचारी,एंजन्ट कायम सेवक म्हणून तुमच्या सेवेत दाखल आहेत.


व्हिजन
बुवानंद अर्बनमध्ये, आमचे ध्येय आहे दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रामाणिक सेवा प्रदान करणे, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील प्रॉपर्टीची खरी आणि सुरक्षित अनुभूती मिळेल. आम्ही केवळ स्थावर मालमत्ता उपलब्ध करून देत नाही, तर प्रत्येक ग्राहकाच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
मिशन
ग्राहकांचे समाधान हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे. भुवनंद अर्बनमध्ये, आम्ही पारदर्शक व्यवहार, उत्कृष्ट सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. आमच्या अनुभवाचा वापर करून, आम्ही ग्राहकांच्या स्वप्नातील प्रॉपर्टी खरेदीचा प्रवास सुलभ, सोयीस्कर आणि सुरक्षित करू इच्छितो.
