ठेव योजना

आपल्या गुंतवणुकीवर भरवशाचा परतावा आणि संपूर्ण सुरक्षिततेची खात्री देणे हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही मुदत ठेवींवर अधिकाधिक परतावा देऊन, आपली गुंतवणूक सुरक्षित राहील याची जबाबदारी घेतो.

निवृत्तीनंतर दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी श्री बुवानंद अर्बनची मासिक ठेव योजना उपयुक्त ठरते. या योजनेत गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजासह परतावा मिळतो.

उद्याच्या महत्वाकांक्षी योजना व स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आजच बचतीची सवय लावावी. आवर्तक ठेव योजनेत गुंतवणूक केल्याने नियमित बचत होऊन भविष्यात एक मोठी रक्कम आपल्या हातात येते.

लहानसहान गरजा पूर्ण करताना मोठी स्वप्नं बाजूलाच राहतात. पण आता तसं होणार नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल साकार, श्री बुवानंद अर्बनच्या त्रिवर्धित ठेव योजनेसह, ज्यात गुंतवणुकीवर मिळेल तीनपट लाभ.

मुलांचे लग्नकार्य हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक साधनांची गरज भासते. या तयारीसाठी आगाऊ नियोजन म्हणून या योजनेत गुंतवणूक करणे लाभदायक ठरते.

संचित बचत योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्यातून मोठा लाभ मिळवता येतो. सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग म्हणजेच, जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक कालावधीनंतर तीन पट परतावा मिळेल!

मोठी स्वप्नं साकार करण्यासाठी हवी मोठी कमाई! श्री बुवानंद अर्बनच्या दाम दुप्पट योजनेत ठराविक कालावधीनंतर तुमची गुंतवणूक दुप्पट होते. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.

ती! जिनी केवळ घरात असण्याने आनंदाचा अनुभव दिला, जिनच्या पावलांनी घरात सुखाचा वास होतो. तिच्या लाडक्या लेकीचे स्वप्न साकार करा, श्री बुवानंद अर्बनच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या सहाय्याने!

आजच्या गरजा आणि भविष्याची स्वप्नं एकत्र पूर्ण करण्यासाठी सादर आहे श्री बुवानंद अर्बनची 'फ्युचर बिल्डर ठेव योजना'. या योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आजच संपर्क करा.